Breaking
सामाजिक दायित्व : वाहतूक पोलिसांना सेफ्टी ग्लास व मास्क वाटप

वाहतूक पोलिसांना सेफ्टी ग्लास व मास्क सुपूर्द करताना..

स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांचा पुढाकार


पिंपरी चिंचवड : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चिखली तळवडे वाहतूक शाखा विभाग व कुदळवाडी पोलीस चौकी यांना सेफ्टी ग्लास व मास्क वाटप केले.

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महानगरांमध्ये ओमायक्रॉनमुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रन्टलाइन वॉरियर म्हणून काम करणाऱ्या योद्ध्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. हे सामाजिक दायित्व ओळखून स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी चिखली, तळवडे, कुदळवाडी पोलीस चौकीतील वाहतूक पोलिसांना सेफ्टी ग्लास व मास्क वाटप केले. 

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड, पोलीस अधिकारी सचिन देशमुख उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा