Breaking

जुन्नर शहरातील अभ्यासिका ठरते विद्यार्थ्यांना वरदान !


जुन्नर / शिवाजी लोखंडे : शहरातील परिवर्तन करिअर अकॅडमी विद्यार्थ्यांना वरदान ठरत आहे. १०० हून अधिक विद्यार्थी दररोज अभ्यासिकेचा लाभ घेतात. पुणे शहरात मिळणाऱ्या सर्व सुविधा जुन्नर शहरातच मिळतात. अभ्यासिकेसाठी पुणे शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुण्यात जाण्याची गरज भासत नाही. पुणे शहरात रहाणे न परवडल्यामुळे पुण्यातून जुन्नरकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढला आहे.


UPSC, MPSC, IBPS, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, सेट, नेट, राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांमधील नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची येथे कायम रेलचेल असते. अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून MPSC, तलाठी, पोलीस, रेल्वे, लिपिक, वनरक्षक, महानगर पालिका, जिल्हा परिषद आदी सरकारी नोकरीतील पदांवर भरती झाल्याने अभ्यासिकेचा तालुक्यात खूपच बोलबाला होताना दिसतो आहे.

 
मुला-मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कंम्पार्टमेंट, स्वतंत्र टॉयलेट व्यवस्था, शांत आणि सुसज्ज वातावरण यामुळे विद्यार्थी अभ्यासिकेत रमताना पहावयास मिळतात.

मोफत हाय स्पीड इंटरनेट सुविधेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे व्यापक मटेरीअल, मार्गदर्शन, ऑफ लाईन / ऑनलाईन क्लासेसची सुविधा देखील उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे आठवड्याच्या सातही दिवस व्यवस्थापनाला अभ्यासिका चालूच ठेवावी लागत आहे.

 
शनिवार आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग अभ्यासिकेला प्रवेश घेत असतात. सामाजिक जाणीवेतून अभ्यासिकेची खूपच अल्प फी असल्याने अगदी सामान्य विद्यार्थ्यांना देखील प्रवेश घेता येतो.

ऑनलाईन अर्ज भरणे, झेरॉक्स, प्रिंट, स्कॅन च्या सुविधा जागेवरच उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची अधिकची सोय निर्माण झालेली आहे. परिवर्तन करिअर अकॅडमीच्या व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मागदर्शन आणि आलेल्या अडचणी समजल्या जातात.


अनेक विद्यार्थी एकत्र येऊन अभ्यास करत असल्यामुळे स्पर्धा परीक्षांतील नवीन बदल, भरती बाबतच्या जाहिराती, गटचर्चा, अभ्यासाच्या रणनीती, वेळेचे व्यवस्थापन यांसारख्या गोष्ठी ताबडतोब माहीत होतात. आणि यामुळेच स्पर्धा परीक्षांमधील येथील निकालाची परंपरा चांगली असलेली दिसते आहे. दिवसेंदिवस वाढणारी विद्यार्थी संख्या यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत हा व्यवस्थापनापुढील चिंतेचा विषय बनत चालला आहे.
 
अधिक माहितीसाठी संपर्क :
परिवर्तन अभ्यासिका आणि परिवर्तन करिअर अकॅडमी, जुन्नर

संपर्क : ९९७५४२२६८२ / ९७६६२७३७९०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा