Breaking
तलासरी : ब्राम्हणगाव येथे मनरेगा अंतर्गत भात शेती दुरुस्तीचे काम सुरू


पालघर : मौजे ब्राम्हणगाव ता.तलासरी येथे कृषी विभागाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांची जुनी भात शेती दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आली आहे.


मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कृषी सहाय्यक एल. डी. भोये व रोजगार सेवक अंकेश बुजड यांच्या सहकार्याने जॉब कार्ड धारक मजूर यांना काम दिले.

मनरेगा मुळे गावातील मजूरांना काम मिळाले असून गावातील रोजगारासाठी न स्थलांतर थांबणार आहे. तसेच शेती सुधारणा होऊन शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा