टॅंक कंपोनंट लि. मध्ये वेतनवाढ करार, असे मिळणार लाभ !
पिंपरी चिंचवड : चाकण औद्योगिक वसाहतीतील टॅंक कंपोनंट लिमिटेड आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्या मध्ये वेतन वाढीचा करार संपन्न झाला.
आज मंगळवार दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी चाकण औद्योगिक वसाहाती मधील निघोजे येथील टॅंक कंपोनंट लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या वेतनवाढ करारावरती आमदार महेश लांडगे व रोहिदास गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. या करारानुसार कामगारांना प्रत्येकी 12 हजार 500 रुपये दरमहा वेतनवाढ देण्यात आली आहे.
करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :
1. 12 हजार 500 रुपये प्रत्यक्ष पगार वाढ ही पहिल्या वर्षी 80 टक्के दुसऱ्या वर्षी 10 टक्के तिसऱ्या वर्षी 10 टक्के मिळणार आहे.
2. कराराचा कालावधी 1 एप्रिल 2021ते 31 मार्ग 2024 या तीन वर्षांचा राहील.
3. मेडिक्लेम पॉलीसी 1 लाख रुपये संपूर्ण खर्च कंपनी करणार, व जादाची 3 लाख रुपयांची बफर पॉलीसी.
4. मृत्यू साहाय्य योजना लागू करण्यात आली.
अ. मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार आणि 5 लाख रुपये कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब. एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.
5. ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी योजना 2 लाख 500 हजार
6. जर एखाद्या कामगाराचा कंपनीत कामावर असताना अपघात झाल्यास त्यामुळे त्याचे काही काळा नंतर उद्धवणार्या आजाराचा खर्च पूर्णपणे कंपनी करणार.
7. सुट्ट्या खालीलप्रमाणे :
A. PL - 15
B. SL - 08
C. CL - 08
D. PH -10
E. मतदानाची सुट्टी सरकारी आदेशानुसार राहील,
F. शॉर्ट लिव्ह - एका महिन्यात दोन वेळा देण्याचे मान्य.
8. दिवाळी बोनस 15 हजार 200 रूपये वार्षिक बोनस म्हणून देण्यात येईल, व एक भेट वस्तू देण्यात येईल.
9. वैयक्तिक कर्ज सुविधा - प्रत्येक कामगारास 40 हजार रुपये देण्याचे मान्य.
10. वार्षिक स्नेह संमेलन- प्रत्येक वर्षी वाढीव स्वरूपात करण्याचे मान्य.
11. प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ९ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.
करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, रोहिदास गाड़े, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शाम सुळके, खजिनदार अमृत चौधरी, माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर भाजपा अनिल लोंढे, साईराज येळवंडे, तेजश बिरदवडे, प्रशांत पाडेकर, सोमनाथ जानराव, रविंद्र भालेराव, यूनिट अध्यक्ष दिपक बऱ्हाटे, उपाध्यक्ष मिंन्टू कुमार, सरचिटणीस प्रवीण वाडेकर, सहचिटणीस अनिल कुंभार, खजिनदार सवाई सिंह, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे सी.इ.ओ. राजेश खन्ना, प्लांट हेड गिरीश भेंडगावे, एच आर मॅनेजर अविनाश चोरमाले यांनी सह्या केल्या.
संघटनेच्या वतीने आमदार महेश लांडगे, अध्यक्ष जीवन येळवंडे व कंपनी सी.ई. ओ.राजेश खन्ना यांनी उपस्थित कामगार व व्यवस्थापन यांना मार्गदर्शन केले. तसेच पुजाताई थिगळे यांनी सूत्रसंचालन केले, व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
- क्रांतिकुमार कडुलकर
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा