Breaking


समता प्रस्थापनाचे राजकारण व समाजकारण पुढे नेणे हीच एन.डी. व पदकी यांना खरी आदरांजली


समाजवादी प्रबोधिनीतील शोकसभेतील मत


कोल्हापूर : समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ, महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी - प्रबोधन - विज्ञानवादी - साम्यवादी - विवेकवादी - चळवळीचे नेते, शेतकऱ्यांचे- वंचितांचे- कष्टकऱ्यांचे - सर्वहारा वर्गाचे तारणहार आणि आपल्या अफाट कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.डॉ.एन.डी. पाटील. एन.डी. सरांच्या निधनाने महाराष्ट्राने चळवळीचा भीष्माचार्य गमावला आहे. 

तर अंधश्रद्धा निर्मूलनापासून आरोग्या पर्यंतच्या आणि विविध हस्तकलांपासून ते आरोग्यदायक आहारापर्यंतच्या विविध महत्त्वाच्या विषयांना लोकचळवळीचे रूप देत इचलकरंजी परिसर व कर्नाटकात संपूर्ण पदकी परिवार अविवाहित राहून गेले अर्धशतक कार्यरत  आहे त्यांच्या कुटुंबातील शंकर नारायण पदकी हे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने कालवश झाले. 


महाराष्ट्र व राष्ट्रीय पातळीवरील एक ख्यातनाम बुलंद विचारवंत नेता आणि जमिनीस्तरावर काम करणारा एक हाडाचा कार्यकर्ता आपण गमावला आहे. त्यांचे समाजप्रबोधनाचे, परिवर्तनाचे, विवेकवादाचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. तसेच रंजलेल्या, गांजलेल्या, सर्वहारा, शेतकरी, कष्टकरी वर्गाला न्याय देणारे समता प्रस्थापनेचे राजकारण व समाजकारण पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत समाजवादी प्रबोधिनीत झालेल्या सर्व राजकीय पक्ष व सर्व सामाजिक संस्था- संघटना- चळवळी यांच्या वतीने आयोजित केलेल्या ' एन.डी. व पदकी आदरांजली शोकसभेत' व्यक्त करण्यात आले.

समाजवादी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष जेष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ.जे.एफ.पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रस्ताविकातून एन.डी.व पदकी यांच्या कार्याचे महत्व अधोरेखित केले.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, प्रा.डॉ.अशोक चौसाळकर, प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील, रवी जाधव, मदन कारंडे, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, जयकुमार कोले, अजित जाधव, सयाजी चव्हाण, प्राचार्य ए.बी.पाटील, बजरंग लोणारी, नाना पारडे, जावेद मोमीन, दत्ता माने, विनायक चव्हाण, डी.एस.डोणे, हणमंत लोहार, भरमा कांबळे, अभिमन्यू कुरणे, शंकर असगर, धोंडिबा कुंभार, अभिजित पटवा, रामभाऊ ठिकाणे, ऍड.जयंत बलुगडे, प्रा.मोहन पुजारी, राजन मुठाणे, पांडुरंग पिसे, प्रमोद घालवाडकर, सुनील स्वामी आदी विविध पक्ष - संस्था - संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.एन.डी.पाटील व एस.एन.पदकी यांच्याविषयीच्या आठवणींचा जागर केला.


यावेळी संजय होगाडे, प्रकाश दत्तवाडे, राजूदादा आरगे, रामदास कोळी, दत्तात्रय कसलकर, पंडित ढवळे, राजेंद्र बिरनाळे, सौरभ मोरे, सुनील बारवाडे, राजा कांबळे, संजय टेके, अजित मिणेकर, उमेश पाटील, दीपक पंडित, बसगोंडा बिरादर, आनंदा हावळ, मनोहर जोशी, प्रल्हाद मेटे, महेंद्र जाधव, दीपक पंडित, बाळासाहेब पाटील, सुभाष शिरगावे, राकेश रजपूत, सचिन पाटोळे, शंकर भाम्बीष्टे, अरिहंत कुपवाडे, सतीश मगदूम, जीवन कुलकर्णी, नरसिंह  वझे, बी.जी.देशमुख, चंद्रकांत कांबळे, आप्पासाहेब कालेकर, संदीप जगताप, सतीश कुलकर्णी, आनंदा शिंदे, के.एम.पाटील आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

तसेच खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार अरुणअण्णा लाड,दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, प्रताप होगाडे, रंगनाथ पदकी आदींनी शोकसंदेश पाठविले. शेवटी एन.डी.ना अतिशय आवडणारी जयंत गडकरी लिखित 'माझ्या माणसांनो' ही कविता प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केली. सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून एन.डी.पाटील व एस.एन.पदकी यांना आदरांजली वाहिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा