राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात शीत दिवस व शीत लहरीची शक्यता, 25 व 26 जानेवारी ला.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 25, 2022
- IMD Mumbai pic.twitter.com/NElJMlOLEz
राज्यात आज आणि उद्या 'या' भागात 'शीत लहरी', हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा !
मुंबई : सध्या राज्यात थंडी वाढली असून गारठ्याने उंचांक गाठला आहे. तर राज्यात थंडीची लाट येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सध्या राज्यभरात थंडीचा कडाका असताना पुढील काही दिवसांत आणखी थंडी वाढणार असुन थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागानं म्हटले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचंही हवामान विभागाचं म्हणणं आहे.
तर उत्तर-पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 25 व 26 जानेवारीला शीत दिवस ( Cold Day ) व शीत लहरी ( Cold Wave ) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभुमीवर हवामान विभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा