Breakingमंगळवारी राज्यात ३४ हजार ४२४ नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंदमुंबई, ता १२ : सध्या जगभरात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धुमाकुळ घातला आहे, दररोज जगभरात लाखों रुग्ण आढळुन येत आहेत. राज्यातील कोरोनाच्या संख्येत देखिल मोठी वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.


मंगळवारी राज्यात ३४ हजार ४२४ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळुन आले तर १८ हजार ९६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच, राज्यात ३४ नविन ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात आतापर्यंत एकुन १२८१ ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली असुन त्यापैकी ४९९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या ओमायक्रॉनचे ७८२ अॅक्टिव रुग्ण आहे. मागिल २४ तासात राज्यात २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर २.०२ टक्के झाला आहे.

 


 मागील काही दिवसातील रूग्ण संख्या

५ जानेवारी २६,५३८ रूग्ण
६ जानेवारी ३६,२६५ रूग्ण
७ जानेवारी ४०,९२५ रूग्ण
८ जानेवारी ४१,१३४ रूग्ण
९ जानेवारी ४४,३८८ रूग्ण
१० जानेवारी २९,६७१ रूग्ण
११ जानेवारी ३४,४२४ रूग्ण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा