Breaking

युक्रेन - रशिया तणाव पराकोटीला; रशियाच्या गुप्त मिशनमुळे युरोपमध्ये हाय अलर्ट


किव्ह : उत्तर अटलांटिक संधी(NATO)मध्ये युक्रेन सामील झाल्यास आम्ही ते सहन करणार नाही, असा गंभीर इशारा रशियाने दिला आहे. युक्रेनवर रशियाने आक्रमण करू नये. युक्रेनला स्वतंत्र भूमिका आहे. या मुद्द्यावरून अमेरिका आणि रशियाची बोलणी फिस्कटली आहेत. अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रे रशियाला सामरिक पातळीवर घेरत आहेत, असा रशियन तज्ज्ञांचा आरोप आहे.


युक्रेन मध्ये 2012 पासून नाटो राष्ट्रे सैन्यतळ उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. बलाढ्य रशियन गॅस,ऑइल कंपन्यांचे मोठ्या सप्लाय लाईन युक्रेनच्या प्रदेशातून जात आहेत. रशियाने युक्रेनच्या सीमेवर, क्रिमिया, बेलारूस येथे अति प्रचंड लष्करी सामुग्री सह एक लाख सैनिक, संहारक क्षेपणास्त्रे आणून ठेवली आहेत.


यादरम्यान अमेरिकेन ९० टन प्राणघातक हत्याराची मदत पोहोचवली आहे. यापूर्वी अमेरिकेने यूक्रेनला सैन्य मदतीसाठी मंजूरी दिली होती. त्यानंतर पहिल्यांदा जे सैन्य पाठवण्यात आले, ते यूक्रेनमध्ये पोहोचले आहे. यामध्ये सीमेवर तैनात सैनिकांसाठी हत्यारांचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी डिसेंबर महिन्यात यूक्रेनला 20 कोटी डॉलर म्हणजेच १ हजार 488 कोटी रुपयांचे सुरक्षा सहाय्यता पॅकेज मंजूर केले आहे.

भूतपूर्व सोव्हिएत युनियनाचा भाग असलेल्या युक्रेन मध्ये 2014 मध्ये रशियाने एक मोठे पाऊल उचलत यूक्रेनचा भाग असलेल्या क्रीमियावर कब्जा केला होता. यूक्रेनच्या सैन्यात आणि रशिया समर्थित फुटीरतावाद्यांमध्ये लढाई झाली होती, या लढाईमध्ये 14 हजारांहून अधिक लोकं मारले गेले होते. तर 20 लाख लोकांना आपले घर सोडावे लागले होते.


रशियन अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनचे अमेरिकवादी  विद्यमान सरकार पाडण्याचा कट रचला असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जात आहे. दरम्यान अमेरिकन नागरिकांनी विद्यमान परिस्थतीत रशियात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा