Breaking

राजमाता जिजाऊ यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करणार - खासदार श्रीरंग बारणे यांचे कष्टकरी जनता आघाडीला आश्वासन


बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली खा. बारणेंना दिले निवेदन


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात राजमाता जिजाऊंचा भव्य पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन खा. श्रीरंग बारणे यांनी कष्टकरी जनता आघाडीच्या शिष्टमंडळाला दिले आहे .कष्टकरी जनता आघाडीचे नेते बाबा कांबळे यांनी नुकतीच खा.श्रीरंग बारणे यांची भेट घेतली होती. या वेळी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राजमाता जिजाऊ यांचा पुतळा उभा करावा, अशी मागणी केली. या वेळी हे आश्वासन देण्यात आल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.


या वेळी मराठा सेवा समितीचे अध्यक्ष सदाशिव तळेकर,महाराष्ट्र  मजूर पक्षाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब आडगळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की,  रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्मितीसाठी राजमाता जिजाऊंनी प्रेरणा दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. राजमाता जिजाऊंची प्रेरणा घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवू, व असेच समस्त बहुजनांची प्रेरणा असणाऱ्या जिजाऊंचा पुतळा पिंपरी चिंचवड शहरात उभाराव अशी आमची आग्रही मागणी आहे.


कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी केली. महात्मा फुले पुतळा परिसरात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने लढा देत आहोतच. या लढ्याची मूळ प्रेरणा ही राजमाता जिजाऊ पासून आम्ही घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाला आमच्या मागण्या मान्यच कराव्या लागतील. तसेच पिंपरी चिंचवड शहरात राजमाता जिजाऊ यांचा कुठेही पुतळा नाही. समस्त बहुजनांची प्रेरणा असणाऱ्या जिजाऊंचा पुतळा शहरात उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

- क्रांतिकुमार कडुलकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा