Breaking

जुन्नर : बेल्हे येथे लोकभारती पक्ष शाखेची स्थापना


जुन्नर / रफीक शेख : आज मौजे गाव बेल्हे ता.जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून लोकभारती पक्षाच्या शाखेची स्थापना झाली. यावेळी शाखेचे उद्घाटन जुन्नर तालुका अध्यक्ष खालिद भाई पटेल यांच्या हस्ते झाले. 


तसेच यावेळी जुन्नर तालुका महिला अध्यक्ष छायाताई उपाळकर, जुन्नर तालुका उपाध्यक्ष महेश थोरात, जुन्नर शहर महिला अध्यक्ष रिनाताई राजू खरात, बाराबलुतेदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तसेच राजे उमाजी नाईक संघटनेचे पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिरतर, अमोल भोजनेआदि मान्यवरांची भाषणे झाली. 


यावेळी बेल्हे शाखा अध्यक्ष सुनील शितोळे, उपाध्यक्ष सरफराज शेख, महिला अध्यक्ष मनिषाताई फावडे, महिला उपाध्यक्ष फरजाना शेख यांना लोकभारती जुन्नर तालुका पदाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

गरीब व गरजू लोकांचे प्रश्न शासन दरबारी रीतसर पाठपुरवठा करून न्याय दिला जाईल असे खालिद पटेल यांनी यावेळी आश्वासन दिले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका उपाध्यक्ष फिरोज भाई पटेल त्याचप्रमाणे ग्रा.पं.सदस्य व लोकभारती शिंदेवाडी शाखा अध्यक्ष जब्बार शेख, तसेच लोकभारती जुन्नर शहर महिला उपाध्यक्ष शगुफ्ताताई ईनामदार, कार्याध्यक्ष रफिक तकि, आणे शाखा अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष संपत शिंदे, महिला अध्यक्ष हिराबाई आहेर, पेमदरा शाखा अध्यक्ष गणेश गोफणे, उपाध्यक्ष सचिन गोफणे, बेल्हे शाखा अध्यक्ष सुनील शितोळे, उपाध्यक्ष सरफराज शेख, महिला अध्यक्ष मनिषाताई फावडे, महिला उपाध्यक्ष फरजाना शेख, कार्याध्यक्ष नाथा शिरतर, सचिव गणेश गाडेकर, सं.सचिव शानुरबाई बेपारी उपस्थित होते.

तसेच सदस्य गणेश जेडगुले, संतोष बोऱ्हाडे, लखन शितोळे, उत्तम शितोळे, सूरज शिरतर, तसेच राजुरी शाखा अध्यक्ष सागर गुळवे, उपाध्यक्ष अब्दुल पटेल, महिला अध्यक्ष मीनाताई मोरे, नवाब चौगुले, त्याचप्रमाणे आळे शाखा महिला अध्यक्ष वंदना शिरतर, तसेच ओतूर शाखा अध्यक्ष शौकत शेख, उपाध्यक्ष कदीर मोमीन, त्याचप्रमाणे दिलीप उपालकर, मुस्तफा सय्यद, किरण उपालकर व इतर समविचारी संघटनेचे मान्यवर उपस्थीत होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा