Breaking

संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक चा जमा खर्च जाहीर !


नाशिक : दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचा जमा खर्च आज प्रथेप्रमाणे नाशिक येथील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. 


संयोजकानी दिलेल्य़ा माहितीनुसार या दोन दिवशीय संमेलनामध्ये दोन हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झालेले होते. या संमेलनात एकूण ५ लाख ६३ हजार ९३७ रूपये खर्च झाला असून याचा ओडिट रिपोर्ट आल्यानंतर येणे बाकीपैकी ६ हजार २०० रूपये प्राप्त झालेले आहे. या पैकी १३०० रुपये खर्च ऑडिट रिपोर्ट व पत्रकार परिषद खर्च आहे. एकूण शिल्लक ४९०० रुपये आहे असे संयोजकांनी सांगितले. 


झालेल्या खर्चात १ लाख ८३ हजार ३७४ रूपये दोन दिवसांत प्रतिनिधीच्या जेवनावर खर्च झाले असून २ लाख रुपये मंडपावर खर्च झाले आहेत. ५२ हजार रुपये सर्व पाहुण्यांचा उघाटन ते समारोपापर्यंत पाहुण्याचा प्रवास खर्चासाठी ५२ हजार खर्च झालेले आहेत तर कोणत्याही पाहुण्यांना मानधन देण्यात आले ऩसल्याचे संयोजकांनी सांगितले. 

बॅनर प्लेक्स साठी ३० हजार ६०० रुपये साऊंड सिस्टीम २७ हजार रुपये. प्रिंटिंग २४ हजार ४०० रुपये स्मृतिचिन्ह साठी २० हजार रुपये. त्याबरोबर व इतर खर्च ४४८४ रुपये झाला आहे. वरील सर्व जमाखर्च अधिकृत लेखापरीक्षक संदीप नगरकर यांच्या कडून तपासून घेण्यात येऊन धर्मदाय आयुक्त नाशिक यांच्या कडे सादर करण्यात आला आहे. बँक संमेलन खाते बंद केले असल्याची माहिती संयोजकांनी दिलेली आहे. 


याचबरोबर या जमा खर्चातून पुढे आलेले निष्कर्ष  संयोजकांनी आज अधोरेखीत केले. यामध्ये कमी खर्चामध्ये उत्कृष्ट साहित्य संमेलन शासकीय अनुदान शिवाय जनतेच्या पैशातून व सहभागातून आयोजित करता येऊ शकते. हे सिध्द झाले असे संयोजकांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर मुठभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी यातून ७३ हजार रुपये जमा झाले तर देणाऱ्याला अंहकार वाटणार नाही. आणि घेणाऱ्या न्य़ुनगंड वाटणार नाही अशाप्रकारच्या सम्यक निधीसंकलानातून, छोठ्या-मोठ्या देणग्यांतून उर्वरीत निधी प्राप्त झाला आहे. याठिकाणी जमिनीचा कोणताही भाडे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने घेतले नाही. त्याचबरोबर वस्तु रूपाने आणि ठेवा रुपाने अनेकांनी मदत केली आहे. असे संयोजकांनी आज सांगितले.

विद्रोही साहित्य संमेलनात ठराव केल्याप्रमाणे 50 लाख रुपये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देऊ नये, ते बंद करावे, अशी आग्रही मागणी आज पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. यानंतरचे साहित्य संमेलन १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी जाहीर करण्यात आले असून नाशिक करांनी ज्यापद्धतीने १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन यशस्वी केले आहे. त्याप्रमाणे पुढील साहित्य संस्कृतिक वाटचालीतही मार्गदर्शन करावे, सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले असून या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनास अप्रत्येक्ष प्रत्यक्ष मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्ती, संस्था, हितचिंतक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत, लेखक, कार्यकर्ते यांचे आभार मानले. 

पंढरपूर ला वारकरी किंवा दीक्षा भूमीवर जसे कोणत्याही निमंत्रण व मानधन शिवाय येतात. तसेच साहित्य संमेलन ला येण्याची खरी महाराष्ट्र परंपरा विद्रोही साहित्य संमेलन ने पुढे चालवली आहे असे संयोजकांनी सांगितले. 

पत्रकार परिषदेसाठी विद्रोही संस्कृतिक चळवळीचे मुख्य संघटक किशोर ढमाले, संमेलनाचे मुख्य संयोजक कॉ. राजु देसले, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, संयोजन समितीचे पदाधिकारी शिवदास म्हसदे, व्ही.टी. जाधव, चंद्रकांत भालेराव, इंजिनिअर प्रल्हाद मिस्त्री, जयवंतराव खडताळे,  स्वागत अध्यक्ष शशी उनवणे, अड. मनिष बस्ते, गणेश उन्हवणे, गुलामभाई शेख, नानासाहेब पटाईत इत्यादी मान्यवर हजर होते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा