Breaking

आझाद मैदानावर आजपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन


मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, मराठी ऍप, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ, आहाराच्या दरात वाढ इत्यादी मागण्यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर रायगड इत्यादी जवळच्या जिल्ह्यांमधील अंगणवाडी कर्मचारी आज पासून तीन दिवस आझाद मैदान, मुंबई येथे तीव्र धरणे आंदोलन करणार आहेत. 


या आंदोलनात मुंबई व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी रोज २०० च्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती अंगणवाडी संघटनेच्या नेत्या शुभा शमीम यांनी दिली आहे. 


भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !



तसेच आंदोलनात कृती समितीचे एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील आदीसह प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.


अरे वा ! आता दोन ते सहा वर्षाच्या मुलांना ही लवकरच मिळणार कोरोना लस !


12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा