Breaking

बिरसा क्रांती दल ची वार्षिक आढावा बैठक चंद्रपूर येथे संपन्न


चंद्रपूर : आज (दि‌. २४) बिरसा क्रांती दल ची आढावा बैठक चंद्रपूर विश्राम गृह येथे संपन्न झाली. बैठकीत जिल्हा तथा तालुका चे क्रायकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अधयक्षस्थानी बिरसा क्रांती दलाचे राज्य संघटक विष्णू कोवे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभाकर गेडाम उपस्थित होते. बिरसा क्रांती दल ची समोरची वाटचाल काय असणार या बद्दल माहिती दिली. यावेळी प्रभाकर गेडाम यांनी समाजपरिवर्तन कसे होणार, बिरसा क्रांती दल ची समोरची वाटचाल काय राहायला हवी याबद्दल माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या रंजना कींनके, मधुकरजी कोडापे, धनराजजी ताडाम, प्रलाद जी गेडाम, प्रकाश जी मेश्राम,मनोहरजी मेश्राम, दशरथ जी गेडाम, चारुदत्त तोडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी संघटना प्रसार व प्रचार कसा करावा, बिरसा मुंडा आदिवासी सहकारी पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुका तिथे बिरसा क्रांती दल शाखा सुरु करुन कार्यकारिणी गठित करणे. गाव, पाडा, गुडा तिथे शासकीय योजनां पोहचवून शिक्षण, आरोग्य विषयक कामे करून समाजाचा विकास करणे, आदी विषयावर चर्चा करून बिरसा, शाहू, फुले आंबेडकर ह्यांचे विचार घरा घरात पोहविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

बैठकीस जिल्हाध्यक्ष बिरसा एम्प्लॉइज फोरम रमेश आडे, जिल्हाध्यक्ष संतोष कुळमेथे, युवा जिल्हाध्यक्ष अभिलाष परचाके, महासचिव जितेश कुळमेथे, उपाध्यक्ष शुभाष शेडमाके, सुशील मडावी, युवा उपाध्यक्ष सूप्रशिल गेडाम, महिला उपाध्यक्ष प्रीति मडावी, किरणताई गेडाम, चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष रेखा कुमरे, सचिव पूर्णिमा तोडकर, उपाध्यक्ष निर्मला मेश्राम, राजुरा तालुका महासचिव नरेंद्र कुलमेथे दिवाकर मेश्राम, शहर उपाध्यक्ष सुनील मेश्राम व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश कुलमेथे, प्रास्तविक भाषण किरण गेडाम, आभार अभिलाष परचाके, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभाष शेडमाके, सुनील मेश्राम, दिवाकर मेश्राम, सुप्रशिल गेडाम ह्यांनी सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा