Breaking

“शिखर” च्या युवा गिर्यारोहकां कडून मोरोशीचा भैरवगड सर


अंखड हिंदुस्थानाचे स्फुर्तीस्थान! सकल महाराष्ट्राचा स्वाभिमान! छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून  चिंचवड येथील “शिखर फाउंडेशन” अडव्हेंचर क्लबच्या वतीने माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मोरोशीच्या “भैरवगड” ची पश्चिम बाजूची भिंत सर करून “छत्रपती शिवाजी महाराजांना” विनम्र अभिवादन केले.


ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी नावाचे गाव आहे. येथुनच जवळच सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर “भैरवगड” किल्ला आहे. डोंगराच्या उंच पठारावर ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली डाईक प्रकारातील ही एक सुंदर पण तितकीच  राकट कलाकृती आहे. हा किल्ला म्हणजे ४५० फुट उंचीची सरळ सोट भिंतच. याच्या तीनही बाजू ताशीव आहेत तर पुर्वेकडच्या बाजूला पायऱ्या आहेत. पायऱ्या वरून चढणे सुद्धा एक अव्हाणच आहे. त्यामुळे बाकी तिन्ही बाजूचा विचार करणे म्हणजे जिगर आणि साहासाची कोसोटीच!  पण अनेक साहसी मोहिमांचा प्रचंड अनुभव पाठिशी असलेल्या चिंचवड येथील “ शिखर फांऊडेशन” च्या युवा गिर्यारोहकांनी हरिशचंद्र गडाच्या कोकण कड्या पाठोपाठ अवघड असलेल्या भैरवगड च्या मोहिमेचे शिवधनुष्य पेलण्याच्या निर्णय घेतला. 


शिवजयंतीच्या पुर्व संध्येला “ शिखर फाऊंडेशन” चे अध्यक्ष विवेकानंद तापकीर यांच्या मार्गदर्शना खाली सोळा जणांच्या टीमने भैरवगडच्या दिशेने प्रस्थान ठेवले. रात्री उशीर झाल्यामुळे सर्वांनी रात्रीचा मुक्काम मोरोशीत केला. दुसऱ्या दिवशी भल्या पाहटेच आवश्यक सुरक्षा उपकरणाच्या बॅगा आणि खाण्याचे सामान घेऊन सर्वजण भैरवगडाची वाट चालू लागले. दमछाक करणाऱ्या आडीच तासाच्या चढाईनंतर टीम पठारावर पोहचली. त्यानंतर कातळ भिंतीच्या दिशेने जाणाऱ्या निसरड्या वाटेचा सामना करत टीम सकाळी सात वाजता पायथ्याशी पोहचली आणि यानंतर खऱ्या अर्थानं सुरू झाला २२ तासाच्या मोहिमेचा खरा थरार!


12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती


१९ फेब्रुवारी आज राजांची जयंती. त्यामुळे सर्वांच्या देहबोलीतून एक वेगळाच उत्साह जाणवत होता. त्यामध्ये भैरवगड सारखी आवघड मोहीम फत्ते करण्याच्या इराद्याने सरसावलेले तरुण तर कमालीचे उत्सुक दिसत होते. सकाळी आठ वाजता कळ्याभिन्न पाषाण मूर्ती भैरवगडाची विधीवत पुजा करुण, छत्रपती शिवरांयाचा जयघोष करत मोहिमेची सुरुवात झाली. सह्याद्रीतील अवघड मोहिमांचा अनुभव पाठिशी असललेला स्वप्नील आंधळे लीड क्लाईंबरच्या भुमीकेत, तर त्याचा सुरक्षा दोर वैभव देवकर यांच्या हाती असणार होता. 


सावध पण दमदार सुरुवात करत शिखरचा युवा प्रस्तरारोहक सुळक्याच्या दिशेने झेपावत होता. त्याला वैभव उत्तम साथ देत होता. पहिल्या सत्रात स्वप्नीलने पहिले स्टेशन पार करून एक दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर स्वप्नील ची जागी दुसरा युवा प्रस्तरारोहक तान्हाजी दौंडकर यांनी घेऊन दुसऱ्या स्टेशनच्या दिशेने चढाई चालू केली. तान्हाजी अतिशय चपळाईने चढाई करत होता. दुपार पर्यंत त्याने दुसऱ्या स्टेशन पर्यंतची चढाई पूर्ण केली. त्यानंतर त्याने तिसऱ्या स्टेशनच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. प्रचंड ऊन आणि वाऱ्याचा त्याला सामना करवा लागत होता. खरी कसोटी सुरू झाली होती, पण तान्हाजी तसूभरही मागे हाटत नव्हता. शेवटी सुर्य अस्ताकडे निघाल्यामुळे तान्हाजी ने  ट्रायव्हर्स ला रोप फिक्स करून खाली उतरत आजच्या दिवसाची मोहिम येथेच थांबवली.


आज मोहिमेचा दुसरा दिवस. मोहिमेची धुरा अर्थात लिड क्लाईंबर ची भूमीका आज वैभव देवकर साकारणार होता. मोहिम फत्ते च्या इराद्याने वैभव सज्ज होऊन भिंतीच्या दिशेने सरसावला. कालच्या पेक्षा आजची चढाई जिकरीची आणि कसोटीची असणार . त्यामुळे त्याचा सुरक्षादोर भैरवगड मोहिमेचा अनुभव पाठीशी असलेल्या संजय बांठे यांच्या हाती सोपवाला. एका टोकाला उत्साह आणि दुसाऱ्या टोकाला अनुभव व स्थितप्रज्ञता. याच्या मिश्रणाचा परिपक म्हणजे आजच्या दिवसाची चढाई असणार होता. संजय चे मार्गदर्शन आणि वैभवची नेत्रदिपक हालचाल शिखराच्या दिशेने सरसावत होती. 


पाठीमागून थर्ड मॅन च्या भूमीकेत अवश्यक साधन सामुग्री घेऊन स्वप्नील त्यांच्या पर्यंत येऊन पोहचला होता. स्वप्नील च्या पाठोपाठ ५२ वर्षाचा सळसळत्या रक्ताचा युवक सुधिर गायकवाड सुद्धा भिंतीशी दोन हात करत वर सरकत होता. इकडे वैभव ट्रायव्हर्स पार करून बुक सेल्फ पर्यंत येऊन पोहचला होता. मोहिम अंतिम टप्प्याकडे सरकत होती. आता संजयच्या जागेवर सुरक्षा दोर संभाळण्या साठी स्वप्नील पुढे आला होता. वैभव ने बुक सेल्फ मधून चढाई चालू केली. अनुभव, जिद्द, साहस आणि चिकाटी पणाला लावून वैभव चढाई करत होता. त्याला स्वप्नील, संजय आणि सुधीर तसेच पायऱ्याच्या वाटेने चढाई साठी आलेली शिखर ची चाळीस लोकांची दुसरी टीम टाळ्या आणि शिट्टया वाजवून प्रोत्साहन देत होती. शेवटी अथक प्रयत्न आणि साहासाच्या जोरावर वैभवने बुक सेल्फ पार करून स्क्रीच्या खालच्या बाजूला असलेल्या भगव्याच्या ध्वजच्या छायेत स्थिरावला. त्याच्या पाठोपाठ सेकंड मॅन स्वप्नील, थर्ड मॅन संजय आणि पाठोपाठ सुधीर भगाव्या पर्यंत पोहचले. 


भारतीय विज्ञान संस्थेमध्ये विविध पदांच्या १०० जागांसाठी भरती!


एक प्रचंड आव्हानात्मक चढाई आज पार करून हे सर्व जण भितींच्या अर्थात भैरवगड च्या शिखराकडे निघाले होते. येथपर्यंत संपुर्ण काळा पाषाण असल्यामुळे त्याला रोप फिवस करण्यासठी बोल्ट असतात मात्र पुढची चढाई याहून कठीन होती. कारण जवळपास शंभर फूट उंचीपर्यंत स्क्री अर्थात निसरड्या मातीचा सामना करवा लागणार होता. संजयचा आणि मोहीमेचे नेतृत्व करणारे प्रविण पवार आणि विक्रांत शिंदे यांच्या अनुभवाची येथे कसोटी लागणार होती, कारण सर्वात जास्त धोकादायक हीच चढाई होती आणि सूर्य पण अस्ता कडे गेल्यामुळे लवकरात लवकर आणि सुरक्षित चढाई करणे गरजेचे होते. खालच्या बाजूने संजयने आणि वरच्या बाजूने वॉकीटॉकी च्या माध्यमातून प्रवीण ने वैभवला मार्गदर्शन करत पुढे सरकण्यास प्रोत्साहित केले. 


दमदार आणि चिकाटीने गवताचा, झाडाचा अधार घेत तरी कधी सरपटत वैभव देवकर यांनी सांयकाळी ६ वाजून ४० मिनीटांनी ४५० फूटाची चढाई २२ तासाच्या खडतर प्रयत्ना नंतर पुर्ण करत भैरवगडच्या शिखरावर पाऊल ठेवले. पाठोपाठ  स्वप्नील, संजय आणि सुधीर यांनी वर येत ऐकमेकांना अलिंगन देत विजयी क्षण साजरा केला. उर्वरीत टीम सुद्धा पायरीच्या वाटेने वर येऊन विजयी क्षणाची साक्षीदार झाली. सर्वांनी छञपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी!! जय शिवाजी!!! च्या रणभेदी गर्जना देत अवघे असंमत दणानून सोडले.


ह्या मोहिमेमध्ये प्रविण पवार आणि विक्रांत शिंदे यांच्या नेतृत्वात वैभव देवकर, स्वप्निल आंधळे, तानाजी दौंडकर, संजय बांठे, रवि मोरे, सुरभि पवार, स्नेहल बारावकर, वृषाली साळवे, सुशांत काटे, शंतनु लकडे, साहिल लोखंडे, प्रणव पवार, सुधीर गायकवाड, संदिप भरेकर, शिवाजी आंधळे, अनिल दामटे, गणेश बारावकर आणि नंदु लिंभोरे यांनी सहभाग घेतला.  दिनांक १८ फेब्रुवारीला दुपारी २:०० वाजता चिंचवड येथून सुरु झालेल्या ६३ तासाच्या थरारक मोहिमेचा दिनांक २१ तारखेला पाहाटे ५:०० वाजता चिंचवड येथे सर्वजण सुखरूप पोहचल्या नंतरच समारोप झाला. 


सदर मोहिम सुरक्षित पार पडण्यामध्ये “स्की”  या संस्थेचा मोलाचा हातभार होता, कारण भैरवगडा सह सह्याद्रीतील सर्वच सुळक्यावर सुरक्षित अरोहन व्हावे म्हणून उच्च प्रतीचे बोल्टींग त्यांनी केले आहे. सर्व सहभागी टीमच्या वातीने आणि “ शिखर फांऊडेशन” च्या वतीने त्यांचे विशेष अभार मानण्यात आले.


विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून गिर्यारोहन क्षेत्र विविध अपघाताच्या मालिकेमुळे बदनाम होत असतांना; आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुरक्षा साधनांचा वापर आणि अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शना खाली योग्य ती खबरदारी आणि माऊंटन मॅनर्स चे नियम पाळले तर अवघडातील अवघड मोहिम सुद्धा लिलया पार पाडता येऊ शकते, याचेच एक उत्तम उदाहरण काल या युवकांनी घालून दिले.


- शिवाजी आंधळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा