Breaking

ब्रेकिंग : खासदार संभाजीराजे यांचे आमरण उपोषण मागे, "या" मागण्या मान्य !


मुंबई : मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आझाद मैदान येथील आमरण उपोषण मागे घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा करून मागण्या मान्य झाल्याने हा निर्णय घेण्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.


यावेेळी मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री वळसे पाटील, अमित देशमुख यांच्यासह इतर नेते आझाद मैदानावर आले आणि त्यांनी चर्चा करू मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला आहे.


सांगली जिल्ह्यातही शेतकरी आंदोलनाचा भडका, “या” मागणीसाठी पुन्हा महावितरणचे सब स्टेशन पेटवले


मान्य झालेल्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

 

• सारथीचं व्हिजन डॉक्युमेंट ३० जूनपर्यंत तयार करणार, तसेच  सारथीमधील रिक्त पदं १५ मार्च २०२२ पर्यंत भरणार. सारथीच्या आठ उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव १५ मार्चपर्यंत मंत्रिमंडळासमोर मांडणार


• आण्णासाहेब पाटील महामंडळाला अतिरिक्त १०० कोटींचा निधी देणार. व्याज परतावा तातडीनं देणार, क्रेडिट गॅऱंटीमध्ये सुद्धा धोरणात्मक निर्णय घेणार. व्याज परताव्याची मुदत १० लाखांवरुन १५ लाख रुपयांवर वाढवली. तसेच आण्णासाहेब पाटील महामंडळासह इतर दोन महामंडळांवर पू्र्णवेळ संचालक नेमणार.


• गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व वसतीगृहांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार


महिलेकडून ५६ कोटी रूपयांचे हेरॉईन जप्त, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल


• कोपर्डी खून खटल्याप्रकरणी हायकोर्टात दाखल अपिलाची सुनावणी तातडीनं घेण्याची हायकोर्टात मेन्शन करणार. रिव्ह्यू पिटिशनची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात पंधरा दिवसात अर्ज करणार


• मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत गृहविभागाकडून आढावा बैठक घेणार. ज्यांचावर गुन्ह्यांमध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील देखील मागे घेण्याबाबत केस टू केस प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येणार. त्याचबरोबर असे जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतू न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा निर्णय घेण्यात येणार. आंदोलनात मृत पावलेल्या मराठा समाजाच्या व्यक्तींच्या कागदपात्रांची पूर्तता करून नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आंदोलनात मृत पावलेल्यांच्या वारसांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत त्यांना तातडीनं नोकरी देणार.


• सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणातून सुधारित एसईबीसी, ईडब्ल्यूएस शासकीय सेवेतून बाहेर पडतील अशा निवड झालेल्या पण नोकरीपासून वंचित आहेत, अशा सर्वांना नोकरीत सामावून घेण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करुन त्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवणार आहे.


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य !


Kiss : चुंबनाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर


भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा