Breaking

ब्रेकिंग : युक्रेन रशिया युद्ध : अखेर पंतप्रधान मोदींनी केला पुतिन यांना काॅल, यावर झाली चर्चा !


नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु असून युक्रेनची राजधानी कीव सह विविध ठिकाणी मिसाईलने हल्ला करण्यात आल्याचं समोर येत आहे.  ठिकठिकाणी सैन्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यूही झाला आहे. 


गुरुवारी पुतिन यांच्या आदेशानुसार युद्धाची घोषणा करण्यात आली. यानंतर सकाळी कीव सह डोमेस्टिक मध्ये पाच स्फोट झाले. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला आहे. तसेच, युक्रेनच्या भारतातील राजदुतांनी भारताकडे मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याविषयीची भूमिका घेण्याची विनंती केली होती.


रशिया युक्रेनच्या युध्दासंदर्भात भारतातील काही मीडियाकडून फेक व्हिडिओचा वापर, अल्ट न्यूजने केला पर्दाफाशरशिया युक्रेन यांच्यात युध्द सुरू, भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण


त्यानंतर गुरूवारी रात्री पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधानांना युक्रेनच्या अलीकडील घडामोडींची माहिती दिली. रशिया आणि नाटो यांच्यातील मतभेद प्रामाणिक संवादानेच सोडवले जाऊ शकतात, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.


पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या, विशेषत: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भारताची चिंता व्यक्त केली आणि सांगितले की भारत त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि भारतात परत येण्याला सर्वोच्च प्राधान्य देतो. तसेच, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मान्य केले की त्यांचे अधिकारी आणि मुत्सद्दी संघ स्थानिक हितसंबंधांच्या मुद्द्यांवर नियमित संपर्क कायम ठेवतील. या संबंधीचे वृत्त एएनआयने दिले आहे.


आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !


भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा