Breaking

पिंपरी मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडीने ग्राहक, व्यापारी हैराण


पिंपरी चिंचवड : पिंपरीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम गेले वर्षभर अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. येथील दुरुस्तीचे काम टप्प्या टप्प्याने केले जात आहे. गेल्या वर्षी मोरवाडी, आंबेडकर चौकात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. 

आता शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद केल्यामुळे शहराच्या विविध उपनगरातून येणारी सर्व वाहने मेनबाजार, रिव्हर रोड, भाटनगर मध्ये प्रवेश करत आहेत.मालाची चढ उतार करणारी चारचाकी वाहने येथे उभी असतात. बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे ग्राहक दुचाकी, कार इ वाहनासहीत बाजरपेठेत अडकत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. सर्वत्र  होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे ग्राहक आणि व्यापारी त्रस्त झालेले आहेत.

वाहतूक शाखा आणि मनपा प्रशासनाने मुख्य बाजारपेठेत येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन आणि दुरुस्तीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा