पुणे : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी खोचक ट्विट करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी राष्ट्रवादीचा रांगडा गडी तुम्हाला पुरून उरेल, असं अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितले आहे.
मलिक यांना ईडीने सकाळी साडे सात वाजता मलिकांच्या घरून ताब्यात घेतले, सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना आता अटक करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची ईडीची कोठडी दिली आहे.
मोठी बातमी : नवाब मलिक यांना न्यायालयाने दिली 8 दिवसांची कोठडी
सत्तेच्या माडीसाठी
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 23, 2022
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?
पण लक्षात ठेवा...
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी#WeStandWithNawabMalik pic.twitter.com/kaw7AfG8Xj
खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट केले आहे कि, सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी सलते सत्तेवरील महा-आघाडी म्हणून कमळाबाई ती लाविते काडी तपासयंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी पाकळ्यांमध्ये नाहीत का काहीच भानगडी? अशी कविता कोल्हे यांनी शेअर केली आहे. तसेच पुढे ते म्हणाले आहे कि लक्षात ठेवा... पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी” असं ट्वीट त्यांनी केल आहे.
पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, आगीत संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक
मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा