Breaking

सांगली जिल्ह्यातही शेतकरी आंदोलनाचा भडका, “या” मागणीसाठी पुन्हा महावितरणचे सब स्टेशन पेटवले


सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतीसाठी दिवसा वीज द्या, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भडका उडताना दिसत आहे. कोल्हापूर पाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.


शेतकऱ्यांना शेतीसाठी 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी शेतकरी कोल्हापुरातील महावितरण कार्यालायासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेकतकऱ्यांचे आंदोलन करत आहेत. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या अज्ञात शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील महावितरणचे  (MSEB) सब स्टेशन पेटवल्याची घटना घडली आहे. या आगीत कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.


दरम्यान, शेतीसाठी दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी कोल्हापूर मध्येही शेतकरी आंदोलनाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळले होते. हे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात संतप्त शेतक-यांनी ऊसाला पाणी पाजताना सापडलेले २ साप सोडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा