Breaking

मोफत ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास' शिबीराचे आयोजन


पिंपरी चिंचवड : महाराष्ट्राचे आराध्य ‘छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या’ जयंती निमित्त प्रभाग क्रमांक २७ चिंचवडगाव उद्योगनगर मधील रस्टन काॅलनी, एस.के.एफ. काॅलनी व पवनानगर येथिल कोविडचे दोन डोस झालेल्या रहिवाशांसाठी मोफत ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचे शिबिर घेण्यात आले होते.


या शिबिरास अतीशय चांगला प्रतिसाद मिळाला व  सुमारे ५०० पेक्षा जास्त नागरिकांना नगरसेवक ॲड.मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे यांच्या वतीने प्रभु रामचंद्र सभागृहात ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचे’ वाटप करण्यात आले.


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजयुमोचे राष्ट्रीय सदस्य ॲड.विवेकानंद उजळमकर, रस्टन कामगार वसाहत समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी तोडकर, आ.टी.वाघमारे, मोहन वायकुळे, टाटा मोटोर्स युनियनचे माजी सदस्य व पोलीस मित्र सुभाष मालुसरे, एस.के.एफ. कंपणी, युनियनचे माजी सदस्य राजन पाटील, जेष्ठ नागरिक संघाचे सुर्यकांत पारखी, भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजपाचे मंडल सरचिटणीस नंदूकाका भोगले, अतुल मुनोत, सुरेखा जाधव, राघूशेठ चिंचवडे, स्वप्निल शेडगे, पराग जोशी, अतुल कांबळे, चंदू सांगोळकर यांच्या रस्टन कामगार वसाहत समितीचे प्रमुख सदस्य उपस्थित होते.

अत्यंत उत्साहात पार पडलेल्या ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचे’ या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवाराने केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा