Breaking

खुशखबर ! मोफत रेशन 'या' महिन्या पर्यंत मिळणार !


नवी दिल्ली : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. नुकतंच सरकारने एक मोठी घोषणा केली. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) मोफत रेशन वितरण मोहीम मार्च 2022 पर्यंत मिळणार आहे.


केंद्र सरकारच्या आदेशानुसार शिधापत्रिका धारकांना दर महिन्याला 10 किलो मोफत रेशन मिळणार आहे. केंद्र सरकारकडून गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार होती. परंतु राज्य सरकारने ही मुदत होळीपर्यंत वाढवली तसेच मोफत रेशन वितरणाची घोषणा केली आहे.

गरीब कल्याण योजनेतील लाभार्थ्यांना महिन्यातून दोनदा तांदूळ आणि गहू मोफत मिळणार आहे. तसेच खाद्यतेल, मीठ आणि डाळी मोफत दिल्या जाणार आहेत. डिसेंबरपासून शिधापत्रिका धारकांना आणि पात्र कुटुंबीयांना दुप्पट रेशन दिलं जात आहे. अन्न योजनेंतर्गत पात्र घरगुती कार्डधारकांची 13 कोटी 41 लाख 77 हजार 983 युनिट्स आहेत.

- क्रांतिकुमार कडुलकर 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा