Breaking


जुन्नर : चिंचोली काशीद येथे प्रस्थापितांना धक्का; जयमल्हार परिवर्तन पॅनेल विजयी


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील चिंचोली काशीदच्या विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीत जयमल्हार परिवर्तन पॅनेलने एकहाती विजय मिळवल्याची माहिती अरुण काशिद व पांडुरंग काशिद यांनी दिली. 


सोसायटीचे विद्यमान चेअरमन व गावचे सरपंच असलेल्या ग्रामविकास पॅनेलला या निवडणुकीत धक्का बसला आहे. 


निकाल जाहीर झाल्यावर गावकऱ्यांनी विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढली. याप्रसंगी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या अनिता यंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पार पाडले.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : अरुण काशिद, पांडुरंग काशिद, शहाजी खराडे, दिलीप काशिद, विजय काशिद, राहुल काशिद, प्रदीप काशिद, सुधाकर पानसरे, रामचंद्र वाजे, श्रीकांत ताजणे, शोभा काशिद, मंगल काशिद व बेराज राजपूत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा