Breaking

जुन्नर : ...अखेर देवराम लांडे राष्ट्रवादी काँग्रेस च्या गोटात, उद्या 'यांच्या' उपस्थित करणार प्रवेश


जुन्नर : शिवसेनेवर जाहीर नाराजी व्यक्त करत बाहेर पडलेले जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. अनेक दिवसांपासून लांडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू होती, अखेर उद्या (दि.२७) लांडे यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष महेबुब शेख, खासदार अमोल कोल्हे तसेच आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत देवराम लांडे हे १ हजार कार्यकर्त्यांसह प्रवेश करतील, अशी माहिती लांडे यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अमोल लांडे यांनी दिली.

जुन्नर शहरातील महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

1 टिप्पणी: