Breaking

जुन्नर : माणकेश्वर येथे लाकडी तेलघाना व्यवसाय शुभारंभ


जुन्नर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव न्यूक्लिअस बजेट अंतर्गत नवक्रांती महिला बचत गट लाकडी तेलघाणा व्यवसायाचे आज बळवंत गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


आदिवासी महिलांना गावातच रोजगार मिळावा तसेच स्थानिक पातळीवर व्यवसाय निर्मिती व्हावी या उद्देशाने नवक्रांती महिला बचत गटाच्या अध्यक्षा माधुरीताई सतिश कोरडे यांच्या प्रयत्नातून हा व्यवसाय सुरू झाला आहे. 


जुन्नर : 2 मार्च पासून किसान सभेचे आमरण उपोषण


या व्यवसाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारणार असून नैसर्गिक व आरोग्यदायी खाद्यतेल निर्मितीतून आरोग्यासाठी उत्तम प्रतीची खाद्यतेले अधिक फायदेशीर ठरणार आहेत.


हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगाव, पंचायत समिती जुन्नर आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जुन्नर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.


मनरेगा अंमलबजावणीबाबत जुन्नर तालुक्यातील प्रशासनाची उदासीनता




या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड साहेब, जि.प सदस्य देवराम लांडे, प्रकल्पस्तरीय सदस्य दत्ता गवारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी खेडकर, प्रकल्प कार्यालयाचे शिंदे, हिरडा कारखान्याचे अध्यक्ष काळू शेळकंदे, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष मारुती वायळ, किसान सभा पुणे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड विश्वनाथ निगळे, रोजगार हमी अभ्यासक सीमाताई काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ चौधरी, माजी सरपंच पोपट रावते, 


सरपंच सुदाम दिघे, पोलीस पाटील स्वरूप शेळकंदे, राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचाचे प्रा.संजय साबळे, पोलीस पाटील रोहिदास कोरडे, माकप सेक्रेटरी बाळासाहेब वायळ, ऋषिकेश परिवाराचे सुरेश जोशी, किसान सभा सदस्य कोंडीभाऊ बांबळे, दुग्ध व्यावसायिक रामचंद्र लांडे, उपसरपंच रामदास दिवटे, ग्रा.प सदस्या चांगुणाबाई वायळ, नवक्रांती महिला बचत गटाच्या सचिव शेवंताबाई बांबळे, चैतन्य संस्थेच्या सुरेखाताई फुलपगार, निर्मलाताई बीडवई, संगीताताई काळे, कौटुंबिक सल्ला केंद्राच्या अध्यक्षा कल्पनाताई कोरडे, तुळसाबाई उतळे, फसबाई शेलकंदे, मीराबाई उतळे, विमलबाई मेमाणे, आदी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


सोन्याच्या खाणीतील भीषण स्फोटात 59 ठार, 100 जखमी


12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा