Breaking


जुन्नर : आग्या मोहळ मधमाशांचा शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला, १ गंभीर तर ३० जखमी


जुन्नर / आनंद कांबळे : खेड तालुक्यातुन जुन्नरला सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर आगेमोहळाच्या मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. २७) दुपारी घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की कडूस (ता. खेड) येथील डायनामिक इंग्लिश मीडियम स्कुलचे ७० विद्यार्थी ४ बसमधून जुन्नरला आले होते. सकाळी हडसर किल्ल्यावर जाऊन आल्यावर हे ८ वी व ९ वीचे विद्यार्थी धामणखेल जवळील लेणी परिसरात गेले होते. येथील प्राचीन अंबाआंबिका लेणी पाहिल्यावर विद्यार्थी पश्चिम बाजूच्या भूतलेणीकडे वळाले. यावेळी तेथील तीन-चार मधपोळ्यांवरील माश्यांनी विद्यार्थ्यांवर एकाएकी हल्ला केला. त्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी धावत खाली आले. त्यानंतर त्यांना जुन्नर येथे उपचारासाठी आणण्यात आले.



तसेच इतर १० विद्यार्थी व १ शिक्षिकेस नारायणगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. इतर विद्यार्थीपैकी २० विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

डायनॅमीक इंग्लिश मिडीयम स्कुल कडूसचे ६९ विद्यार्थी विद्यार्थिनी पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यात आले होते. हडसर किल्ला पाहून झाल्यानंतर ते मानमोडी डोंगरावरील लेणी पाहण्यासाठी गेले असता मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने गोंधळ उडाला.


सदरची घटना समजताच वनरक्षक खरमाळे, माजी नगरसेवक संजय साखला, उद्योजक संजय वारुळे, मयूर महाबरे, राजकुमार चव्हाण, विनायक मांडे, फिरोज पठाण, प्रशांत कबाडी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. व जखमींना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

आमदार अतुल बेनके यांनीही तातडीने ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे धाव घेऊन संबंधित विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्याबाबत सूचना केल्या.


यावेळी ग्रामीण रुग्णालय जुन्नरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उजगरे, डॉ.सरदे, तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ.अक्षय शेवाळे, डॉ.इनामदार यांनी जखमींवर उपचार केले तर संगीता शिंदे, रेश्मा वर्हाडी, चैताली चव्हाण, सुनंदा पवार, स्वाती खमसे, रत्नप्रभा वायकर, सोनम साळवे, अतिष वाघेला व वाहिद पठाण यांनी जखमींवर उपचार करण्यास सहकार्य केले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा