Breaking

जुन्नर : राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा : कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करावे - जलसंपदामंत्री जयंत पाटील


जुन्नर / आनंद कांबळे : राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना कार्यकर्त्यांशी संवाद घातला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी पक्ष प्रवेश केला. 


यावेळी ना. जयंत पाटील म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील आपल्या सर्वांचा पक्ष संघटनेच्या कामाचा अनुभव दांडगा आहे. वल्लभ बेनके यांच्या काळापासून संघटना कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जुन्नरमधील कार्यकर्त्यांनी दाखविले आहे. पक्षातील प्रत्येकाने तळागाळापर्यंत जाऊन काम केले पाहिजे, हे महत्वाचे आहे. आपणच आपल्या पक्षाचा प्रचार व्यवस्थित केला तर सर्व ठिकाणी विजय मिळविला जाऊ शकतो. त्यासाठी बूथ बांधणी केली पाहिजे. बूथ कमिटीच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविले गेले पाहिजे. तसेच तालुक्यातील आदिवासी समाजाच्या पाठीशी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

या आढावा बैठकीला संबोधित करताना शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, निवडणूक काळात मत मागायला अनेकदा नेते येतात पण कार्यकर्त्यांशी संवाद साधायला आपले प्रदेशाध्यक्ष आज आपल्यात आले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मोठी लाट असताना देखील या जुन्नर तालुक्यातील जनतेने मला तब्बल ४१ हजार मताधिक्य मिळवून दिले होते. जुन्नर तालुक्याचे भाग्य विधाते वल्लभशेठ बेनके यांचा समाजसेवेचा वारसा अगदी उत्तमपणे चालू आहे. राज्यातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर चा पक्ष बनविण्याचा संकल्प आपण करु, असे आवाहन खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

यावेळी जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, विशाल तांबे, संजय काळे, गणपत राव फुळवडे, अनिल तात्या मेहर, शरदराव लेंडे, महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, युवती जिल्हाध्यक्ष पुजा बुट्टे पाटील, संध्या सोनवणे, अरूण असबे, जुन्नर तालुकाध्यक्ष पांडूरंग पवार, उज्वला शेवाळे, युवक तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, बाळासाहेब खिळारी, बाजीराव ढोळे, भाऊ कुंभार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा