Home
जुन्नर
शिक्षण
जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभागाअंतर्गत निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन
जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभागाअंतर्गत निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन
जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षक प्रसारक मंडळ श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर UGC, CPE स्किम योजने अंतर्गत मराठी विभागातर्फे निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आज ( दि. २४) जाहीर करण्यात आला.
या पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक व अध्यक्ष प्रतिनिधी विलास कुलकर्णी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सया राम हेलम, द्वितीय क्रमांक स्वप्निल रामदास भालचिम, तृतीय क्रमांक अवंतिका संपत ताम्हाणे, उत्तेजनार्थ दिव्या संजय वाव्हळ ह्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ.वंदना नढे आणि सहसंयोजन प्रा. विष्णु घोडे व प्रा. महेश गाडेकर यांनी केले.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा