Breaking

जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात रंगले काव्य संमेलन


जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षक प्रसारक मंडळाचे शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन सप्ताह निमित्ताने काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक व प्रमुख उपस्थिती अध्यक्ष प्रतिनिधी विलास कुलकर्णी हे होते.

ह्या कार्यक्रमामध्ये किरण बांगर, प्रतिक्षा ताजणे, प्रिती गाडेकर, अक्षदा शिंदे यांच्यासह विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वरुचीत कविता, विडंबन काव्य सादर केले. तसेच प्राध्यापकांनी ही त्यांच्या स्वरचित कविता सादर केल्या.

या कार्यक्रमाला प्रा.अंकिता वाळूंज, प्रा.रेखा गायकवाड ह्या उपस्थित होत्या. मराठी विभागाच्या विभागप्रमुख प्रा.डॉ.वंदना नढे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले सहसंयोजन प्रा.महेश गाडेकर यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा