Breaking

जुन्नरला ३३ हजार बालकांना पल्स पोलिओचा डोस


जुन्नर / हितेंद्र गांधी : जुन्नर तालुक्यातील ३४०८३ बालकांपैकी पाच वर्षाखालील ३२००९ व पाच वर्षांवरील ७४५ बाळांना पोलिओचा डोस देण्यात आला. ही मोहीम तालुक्यातील ३५५ बुथवरील ८२५ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने पार पडल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली. 


तर उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार असल्याचे आरोग्य सहाय्यक राजेश शेरकर व सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान जुन्नर शहरात पोलिओ डोस देण्यासाठी कार्यरत असलेल्या १८ बुथवरील कर्मचाऱ्यांना रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. 

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात रोटरीचे माजी अध्यक्ष तुषार लाहोरकर म्हणाले की रोटरी गेल्या ३५ वर्षांपासून जगातील १२२ देशांमध्ये पोलिओ निर्मूलनाचे काम करत असून पोलिओला जवळपास हद्दपार करण्यात यश मिळाले आहे. याप्रसंगी रोटरी अध्यक्ष हितेंद्र गांधी, राकेश शाह, धनंजय राजूरकर, नितीन माळवदकर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा