Breaking

मंत्री नबाव मलिक यांना ईडीने घेतले ताब्यात, सकाळपासून चौकशी सुरू

Photo : Facebook / Nawab Malik

मुंबई : अंडरवर्ल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांना सकाळपासून ईडीने ताब्यात घेऊन ईडीकडून चौकशी सुरू आहे.


ईडीने तीन दिवसांपूर्वीच इक्बाल कासकर याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. या चौकशीत त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांचे नाव घेतले. त्यानंतर आज सकाळी सात साडे सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने ताब्यात घेतले, त्यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मलिकांना कोणतीही नोटीस न देता त्यांना कसे ताब्यात घेतले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


प्रियंका गांधी अचानक भेटल्या भाजप समर्थकांना, पुढे काय झाले बघा !


मलिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत, तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून, काही ठिकाणी समर्थकांचे आंदोलन सुरू आहे.


पवार म्हणाले आहेत की, याबाबत काय बोलायचं? यात काही नवीन नाही. सध्या ज्या प्रकारे यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कधीतरी घडेल. असे त्यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा