Breaking

ईडीच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केले दाखल

Photo : Nawab Malik / Facebook

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊदशी आर्थिक व्यवहार आणि इतर आरोप असून मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. मात्र, मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरांवर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली. ईडीने कोठडी नेण्यापूर्वी मलिकांची वैद्यकीय चाचणी केली होती. परंतू मलिक यांची प्रकृती खराब झाल्याने ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


रशियावर झाला सायबर हल्ला ! युक्रेनच्या अज्ञात हॅकर्सची कामगिरी


मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, न्यायालयाने नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत घरचे जेवण तसेच औषधे उपलब्ध करुन देण्याची परवानगी दिली आहे.


व्हाट्सअॅपवरील आक्षेपार्ह मेसेजच्या अ‍ॅडमिनच्या जबाबदारीबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय


ब्रेकिंग : शिवसेना 'या' बड्या नेत्याच्या घरी आयकर विभागाची धाड, पत्नी आहेत आमदार !


आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार ! किसान सभेला आश्वासन


रशिया युक्रेनच्या युध्दासंदर्भात भारतातील काही मीडियाकडून फेक व्हिडिओचा वापर, अल्ट न्यूजने केला पर्दाफाश


1 टिप्पणी: