Photo : Facebook / Nawab Malik |
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने सकाळी साडे सात वाजता मलिकांच्या घरून ताब्यात घेतले, सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना आता अटक करण्यात आली आहे.
अंडरवर्ल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर सक्तवसुली संचालनालय ईडीने मलिकांना ताब्यात घेत चौकशी सुरू होती.
दहावी, बारावीच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
आता चौकशी नंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
मलिक यांच्या अटकेने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील दुसरा नेता मोठा आता ईडीच्या कोठडीत आहे. मलिक यांना ताब्यात घेतल्यानंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर भल्या पहाटे ही कारवाई झाल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, सुडाच्या राजकारणापोटी ही कारवाई होत असल्याचे मलिक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हटले आहे.
प्रियंका गांधी अचानक भेटल्या भाजप समर्थकांना, पुढे काय झाले बघा !
आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा