Breaking

मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन

Photo : Twitter / @Jayant_R_Patil


मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनात आणि केंद्रसरकारच्या विरोधात आज मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपोषण सुरू केले आहे.


अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयाकडून तब्बाल ८ आठ तास चौकशी झाली. त्यानंतर त्यांना अटक करून कोर्टात हजर केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाने ३ मार्च पर्यंत कोठडी सुनावली. नवाब मलिक यांच्यावर केंद्र सरकारने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा त्यांचा आरोप करत महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या विरोधात महात्मा गांधी पुतळ्यापाशी आंदोलन करत आहेत.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण, महावितरणचे कार्यालय पेटविले


तर दुसरीकडे नवाब मलिक यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.दरम्यान, या उपोषणाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते बसले आहेत.


रशिया युक्रेनच्या युध्दाचा सोने-चांदीवर परिणाम, “इतक्या” वाढल्या किंमती


अष्टविनायक गणपती दर्शन हेलिकॉप्टरद्वारे फक्त काही तासांत


दहावी पास उमेदवारांसाठी संधी ! इंडियन बँकेत विविध पदांसाठी भरती


आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा