Breaking


अरे वा ! आता दोन ते सहा वर्षाच्या मुलांना ही लवकरच मिळणार कोरोना लस !


मुंबई : सध्या देशभरामध्ये कोरोना चा कहर जरी कमी झाला असला तरी देखील त्याचा धोका कायम आहे. आतापर्यंत अठरा वर्षापुढील सर्वांना कोविशिल्ड, कोवॉक्सिन अशी लस मिळत होती. परंतु आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने दोन ते सहा वयोगटातील लहान मुलांसाठी कोरोना ची लस 'कोवोवॉक्स' covovax निर्माण केली आहे. 

सध्या दोनशे साठ मुलांना ही लस प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आली आहे. याचा पुढील डोस 21 दिवसानंतर देण्यात येईल असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सांगितले आहे.


या मुलांवर पुढील सहा महिने लक्ष ठेवण्यात येणार आहे. cov 2373 ही अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी फर्म द्वारे विकसित केलेली प्रोटीन आधारित लस आहे. त्याचा भारतातील सिरम इन्स्टिट्यूट शी करार आहे. 

भारतात ते कोवोव्हॅक्स या ब्रँड नावाने ओळखलं जातं. एका हिंदी वेबसाईट नाही याचे वृत्त दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा