Breaking

प्रियंका गांधी आणि भाजप समर्थकांचा हा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, काय झाले बघा !

Photo : Facebook / Priyanka Gandhi Vadra

मुंबई : सध्या पाच राज्यांच्या निवडणुका सुरू असून प्रचार मोहिमाही जोरदार सुरू आहे. अशात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि भाजप समर्थक यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.


भाजपच्या रॅलीतून परतत असलेल्या लोकांची प्रियंका गांधींनी रस्त्यात भेट घेतली, प्रियांकाने त्याच्याशी केवळ हस्तांदोलनच केले नाही तर त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्याकडे काँग्रेसचा जाहिरनामा आणि इतर प्रचाराचे साहित्यही दिले. या व्हिडिओ मध्ये भाजप समर्थकही प्रियांका गधींना ‘लडकी हूं लड़ शक्ति हूं’ असे ब्रेसलेट मागताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


आझाद मैदानावर आजपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन


 

भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !येथे वाचा माहिती!


काँग्रेस पक्षानेही हा व्हिडिओ ट्विट करून हे राजकारणातील दुर्मिळ चित्र असल्याचे म्हटले आहे. तसेच, भाजपच्या रॅलीतून परतलेल्या लोकांनी प्रियंका गांधींना घोषणा पत्र और 'लड़की हूं, लड़ सकती हूं' अशी प्रचार सामग्री मागितली आणि सोबत सेल्फी घेतला. जनतेला 'गर्मी' आणि 'चर्बी' काढणारे नव्हे तर'भर्ती' काढणारे पाहिजे आहे" असे ट्वीट काँग्रेसने केले आहे.तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधींच्या गाडी समोर असंख्य भाजप कार्यकर्ते जमलेले असून प्रियंका या भाजप कार्यकर्त्याच्या हातात हात मिळवत आहे. तर काही लोक त्यांच्या सोबत सेल्फी घेेत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा