Breaking

पुणे : श्रीमती सी.के.गोयल कला वाणिज्य महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा !


पुणे : जनता शिक्षण संस्थेच्या श्रीमती .सी.के गोयल कला वाणिज्य महाविद्यालयात रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.


राजभाषा दिनानिमित्त प्रा. विजयराव लोंढे (टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी, पुणे) यांचे "मराठी भाषा काल, आज, आणि उद्या" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
 

प्रा. विजय लोंढे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, "मराठी भाषेविषयी प्रत्येकाने अभिमान बाळगून, मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम  केले पाहिजे, आपण आपल्या भाषेवर प्रेम केले तर दुसरे प्रेम करतील प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असलाच पाहिजे." 


त्यांनी आपल्या भाषणात आपल्या मराठी भाषेचा उदय, सध्याची स्थिती आणि भविष्यात काय होणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. मराठी भाषेला विशेष दर्जा मिळावा. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी यावेळी नमूद केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र-प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी होते.प्रमुख पाहुणे स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज चे प्रा. विजय बागडे हे होते. तर राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. बाळासाहेब माशेरे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रास्तविक प्रा. दिपाली खर्डे यांनी केले.

यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ दडस, प्रा. डॉ. शोभा शिंदे, प्रा. डॉ .स्वाती काळभोर, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. सुरेखा हरपुडे, प्रा. दिपाली खर्डे, प्रा, अमरदीप गुरमे, प्रा. विनोद डिके, प्रा. उत्तम गोरड, हे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व स्टाफ व५७ विद्यार्थी उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा