Breaking

रशिया युक्रेनच्या युध्दाचा सोने-चांदीवर परिणाम, “इतक्या” वाढल्या किंमती


नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातील गुंतवणूकदार धास्तावले आहेत. याचा जगभरातील बाजारांत परिणाम दिसून येत आहे. शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर आता भारतात सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.


शेअर बाजारातील पडझडीनंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आज गुरुवारी सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. 


इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, गुरुवारी शुद्ध सोन्याचा म्हणजे २४ कॅरेटचा दर ५१,४१९ रुपये (प्रति १० ग्रॅम) तर २३ कॅरेट सोने ५१,२१३ रुपयांवर गेले आहे. यासोबतच चांदीही महागली चांदी प्रति किलो ६६,५०१ रुपयांवर पोहोचली आहे. काल बुधवारी शुद्ध सोन्याचा दर ५० हजारांवर गेला  होता. तर चांदीचा दर ६४,२०३ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. दरम्यान सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोने, चांदीच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देखील सोने चांदीच्या किमतीवर होताना दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा