Breaking

रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठे विमान जळून खाक


युक्रेन : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे सुरू आहे. त्यामुळे तिथे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियन सैन्य कीववर ताबा मिळवण्याच्या तयारीत आहे. असे असताना रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठे विमान एएन२२५ जळून खाक झाले आहे.


“रशियन हल्लेखोरांनी युक्रेन हवाई क्षेत्रातील महत्वाचं आणि विशेष असं एएन-२२५ मिर्या विमान नष्ट केलंय. रशियाच्या हल्ल्यात नष्ट झालेले विमान हे कार्गो विमान होते. त्याची जगातील सर्वात मोठे मालवाहू विमान म्हणून ओळख होती. कीवच्या बाहेर हॉस्टोमेल विमानतळावर हे विमान जळून खाक झाले. हे विमान सुमारे ८४ मीटर लांब, ८८ मीटर पंख आणि १८ मीटर उंच एवढे मोठं होतं. त्याची २५० टन एवढे वजन वाहून नेण्याची या विमानाची अशी क्षमता होती. युक्रेनच्या एरोनॉटिक्स कंपनी अँटोनोव्हने बनवले होते. 


छत्रपती संभाजीराजे यांचे प्रकृती खालावली, उपोषण सुरूचमहाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न - जलसंपदा मंत्री जयंत पाटील


यावर कंपनीने म्हटल आहे कि, विमान नष्ट झालं असलं तरी पुन्हा आम्ही ते निर्माण करु असा विश्वासही व्यक्त करत “आम्ही पुन्हा या विमानाची बांधणी करु. आम्ही आमचं सशक्त, मुक्त आणि स्वतंत्र युक्रेनचं स्वप्न पूर्ण करु,”.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा