Breaking


संत गाडगेबाबांनी स्वच्छतेला दिशा दिली - काशिनाथ नखाते


पिंपरी चिंचवड : राष्ट्रसंत गाडगे महाराज अमरावती जिल्हयातील शेणगांवचे  थोर सुपुत्र होऊन गेले. गाडगेबाबानी समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा मोडीत काढून स्वच्छतेबाबत मोठा आदर्श उभा केला. यातूनच महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात बाबानीं  स्वच्छतेला एक दिशा दिली असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.


कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, चंद्रकांत कुंभार, निरंजन लोखंडे,  इरफान चौधरी , सुरज देशमाने ,रणजीत पाटील, रंगनाथ पालवे, उषा नाईक, अशा शिंदे, नंदा राऊत, मीरा येवले, राजन घुले, अशोक साळवे आदी कामगार बांधव उपस्थित होते.


संत गाडगेबाबाच्या शिकवणुकीतूनच कामगारानीं  आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, फेरीवाला व्यावसायिकांनीही बाबांच्या आदर्शतुन आपला व्यवसाय नीटनेटकेपणा ठेवून स्वच्छतेबाबत अत्यंत जागरुक राहावे.

बाबा संपुर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करावयाची, त्याबदल्यात पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील रुढी, घाण या किर्तनातुन साफ करत होते. त्यातुन समाज प्रबोधन करायचं, समाज कल्याणाचा प्रसार केला. आपल्या किर्तनात ते संत कबीरांच्या दोहयांचा जागर केला.

- क्रांतिकुमार कडुलकर 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा