Breaking

पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, आगीत संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक


अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील पुणे - नाशिक महामार्गावर दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागून संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात आयशर टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुण्याकडे जाणाऱ्या धावत्या टेम्पोला (क्रमांक एम. पी. ३६ एच. ०७९५) पाठीमागील बाजूने अचानक आग लागली. 


मोठी बातमी : नवाब मलिक यांना न्यायालयाने दिली “इतक्या” दिवसांची कोठडी


आज बुधवारी पहाटे टेम्पोला आग लागली. या टेम्पोमधून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या. या आगीत संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याो असून या प्रश्नपत्रिका बारावीच्या असल्याची माहिती मिळते आहे.


या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र, टेम्पो संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


प्रियंका गांधी आणि भाजप समर्थकांचा हा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, काय झाले बघा !


भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !


1 टिप्पणी: