Breaking

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय संप संपाला आयटक संघटनेचा पाठिंबा


नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 23, 24 फेब्रुवारी 2022 चा दोन दिवसीय संप करणार आहेत. या संपाला आयटक या कामगार संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.


 प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : 


1) नवीन पेन्शन योजना (NPS ) रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा. तसेच मध्यंतरीच्या काळात केंद्रीय NPS कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सर्व सुविधा तात्काळ राज्यात लागू करा. 


ब्रेकिंग : संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई, राज्य सरकारचा निर्णय


2) किमान पेन्शन मध्ये केंद्रासमान उचित वाढ करा.


3) सर्वांना समान किमान वेतन देऊन, कंत्राटी व योजना कामगार अंगणवाडी, आशा वर्कर्स, गट प्रवर्तक शालेय पोषण, अंशकालीन स्त्री परिचर, मनरेगा कंत्राटी कर्मचारी, ग्रामरोजगर सेवक, संगणक परिचालक इ. यांच्या सेवा नियमित करा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या.


4) शासकीय विभागात कोणत्याही स्वरूपाच्या खाजगीकरण कंत्राटीकरणास सक्त विरोध आहे. खाजगीकरणाचे निर्णय रद्द करा. व वर्षानुवर्षे विविध खात्यात काम करणारे कंत्राटी कर्मचा-यांना कायम करा.


5) बक्षी समिती अहवाल आजचा खंड २ प्रसिद्ध करा. ( लिपिक व इतर संवर्गीय वेतन त्रुटी)


आझाद मैदानावर उद्यापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन


6) सर्व रिक्त पदे तात्काळ भरा. (आरोग्य विभागास अग्रक्रम द्या.)


7) सर्व भत्ते केंद्रा समान द्या. (वाहतूक, शैक्षणिक भत्ता व इतर भत्ते


8) अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. तसेच कोरोना काळात वयाधिक झालेल्या कर्मचाऱ्यांना विहित वय मर्यादीत


9) नर्सेस / आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करा.


10) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करा.


12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती


11) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न (सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 10:20:30 वर्ष व इतर) तत्काळ सोडवा.


12) नवीन शिक्षक धोरण रद्द करा.


13) वीज महामंडळ चे खाजगीकरण रोखा.


14) किमती कमी करण्यासाठी पेट्रोलियम पदार्थांवरील केंद्रीय कर कमी करा.


निवेदन देतेवेळी आयटक चे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड व्ही डी धनवटे, अरुण म्हस्के, सखाराम दुर्गुडे, माया घोलप, चित्रा जगताप, हसीना शेख, माया घोलप, विजय दराडे, ओंकार जाधव, अनिल बिचकूल, बाबासाहेब कदम, मीना आढाव, सुनीता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा