Breaking


युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, तर विद्यार्थ्यांचे इतरही गंभीर आरोप


नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.


युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांचे व्हिडिओ समोर येत आहे. त्यात एका विद्यार्थ्यांने व्हिडिओच्या माध्यमातून इथली भीषण परिस्थिती सांगितली. युक्रेनमधून पोलंडमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या या विद्यार्थ्यांना बंदुकधारी पोलिसांकडून अडवण्यात आलं तसेच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.


Kiss : चुंबनाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर


एका गुजराती विद्यार्थ्याने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले कि, “चाळीस किमीची पायपीट करुन रात्री १५ डिग्री सेल्सिअस तापमानात आम्ही युक्रेन-पोलंड सीमेवर पोहोचलो. आमच्या पायात बूट-चप्पला देखील नव्हत्या. सीमेवर थांबण्यासाठी आमची व्यवस्थाही नव्हती. आम्हाला सीमापार पोलंडमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. यावेळी बंदुकधारी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.”


भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


युक्रेनमधील युध्दाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अनेक लोक शेजारी देशांचा आसरा घेत आहेत, मात्र युक्रेनमधून शेजारील देशांमध्ये जाताना भारतीयांसोबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. युक्रेन-पोलंड सीमेवर युक्रेनच्या सुरक्षा रक्षकांनी केवळ युक्रेनच्या नागरिकांना प्रवेश दिला आणि भारतीयांना बाजूला काढून मुलं आणि मुली न पाहता लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.एका विद्यार्थ्याने म्हटलं आहे कि, "१० तासापासून आम्ही बॉर्डरवर वाट पाहतोय, पण आम्हाला कुणीही बाहेर काढत नाही, आमच्या मदतीसाठी कुणीही आलेलं नाही इथे कोणताही अधिकारी नाही, आता पर्यत कोणताही संपर्क झालेला नाही. या पेक्षा मेलेलं बरं... फक्त बोललं जातयं कि तुमच्यासाठी अधिकारी उपस्थित आहे पण ईथे कुणीही नाही. आम्ही कसे निघणार बाहेर..." या विद्यार्थ्यानी सांगितलेल्या ह्रदयद्रावक परिस्थितीमुळे भारत सरकारच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित होत आहे. 


आपल्या देशाची अवस्था पाहून खेळाच्या मैदानात गळ्यात पडून रडले खेळाडूकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा