Breaking


तलासरीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय


तलासरी : आज २३ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यात तलासरी नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुरेश भोये नगराध्यक्षपदी तर सुभाष दुमाडा उपनगराध्यक्षपदी विजयी झाले.  कम्युनिस्ट पक्षाचे विलास ठाकरे, संती मलावकर, मानकी भगत आणि रमिला जवळीया हे तलासरीत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 


तलासरी नगरपंचायतीच्या एकूण १७ जागा आहेत. यामध्ये झालेल्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ६, भारतीय जनता पक्ष ६, शिवसेना ३, तर अपक्ष २ असा पक्षीय बोलबाला होता. त्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने इतर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता ही निवडणूक स्वबळावर लढवली. परंतु भाजपने तटस्थ भूमिका घेतल्याने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची माळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पथ्यावर पडली.

तलासरी नगर पंचायतीच्या १९६२ च्या पहिल्या निवडणुकीपासून गेली ६० वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल झेंडा आहे. या निवडीने लाल बावटा चार खंड अखंड ठेवण्याचा विक्रम नोंदविला आहे. 


 निवडीनंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वाजत गाजत विजय रॅली कॉ. गोदावरी शामराव परुळेकर भवनापर्यंत काढण्या आली. तेथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुरेश भोये, उपनगराध्यक्ष सुभाष दुमाडा व सर्व नगरसेवकांचा सत्कार अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माकप जिल्हा सचिव बारक्या मांगात, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले, पंचायत समिती सभापती नंदू हाडळ यांच्या हस्ते संपन्न झाला. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा