Breaking

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य !


Photo : Twitter / @BSKoshyari

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोश्यारी हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना बोलत होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला असून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. 


भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.”राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ट्वीट करून म्हटलं आहे कि, “राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.” असे म्हणत नाराजी व्यक्त केली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा