Breaking


खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे काम, आ. रोहित पवार यांची टिका


मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. त्याच बरोबर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता यावर आमदार रोहित पवार यांनी देखील राज्यपालांच्या माफीची मागणी केली आहे. 


आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करून म्हटलं आहे कि, “खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं.”


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य !छत्रपती संभाजीराजे यांचे प्रकृती खालावली, उपोषण सुरूच


राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. असे म्हणत पुढे राज्यपालांच्या माफीची मागणी रोहित पवार यांनी केली आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा