Breaking

दहावी, बारावीच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय


नवी दिल्ली : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला होती, यामुळे परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.


सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं या याचिका परीक्षांबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या असल्याचं म्हणत हि याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. 


अरे वा ! आता दोन ते सहा वर्षाच्या मुलांना ही लवकरच मिळणार कोरोना लस !


तसेच, गेल्या वर्षी कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिका या विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या आशा निर्माण करतात, असे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार हे स्पष्ट झालेले आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान घेण्यात येणार आहेत.


भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती


मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा