Breaking

RRR चित्रपटाचा परिणाम.. थेटर मालकाने स्क्रीन शेजारी ठोकले खिळे..!'बाहुबली'चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटाबाबत गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्याचवेळी, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये सिनेमा हॉलमध्ये स्क्रीनसमोर हजारो खिळे ठोकलेले दिसत आहेत. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले! या व्हायरल फोटोचे संपूर्ण सत्य काय आहे हे जाणून घेवूया.


इंडियन प्रीमियर लीगच्या IPL 15 व्या पर्वाचा बिगुल आज मुंबईत वाजणार !

खरंतर हा चित्रपट पाहण्याची लोकांची क्रेझ जोरात आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे सर्वत्र गर्दी आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रुपेरी पडद्यासमोरील जागेत हजारो खिळे ठोकलेले दिसत आहेत. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथिल 'अन्नपूर्णा कॉम्प्लेक्स' या थिएटरचा हो फोटो आहे. हा फोटो थेटरच्या अधिकृत ट्विटर हॅंन्डलवरून शेअर करण्यात आला आहे.


रशिया - युक्रेन युद्ध : पुतीन यांचा युरोपला दणका, रुबल मध्येच पैसे स्वीकारले जातील
या फोटोमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की स्क्रीनच्या अगदी समोरच्या रिकाम्या जागेत अनेक खिळे टाकण्यात आले आहेत. यासोबत तेलुगू भाषेत मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे - धोका. दक्षिण भारतात सिनेमाप्रेमी अनेकदा या ठिकाणी चढतात आणि गाणे सुरू असताना नाचतात देखील. एवझेच नाही तर या ठिकाणी आरती करून धूप अगरबत्ती देखील लावली जाते. ज्यामुळे अनेकदा आगीसारखे अपघातही घडले आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या सिनेमागृहाच्या मालकाने हे पाऊल उचलले आहे. आता थिएटर मालकाच्या या कारवाईची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.


१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरतीकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा