Breaking

“या” मागणीसाठी आम आदमी पार्टीचे मुंबईत जोरदार आंदोलन, पोलिसांकडून आंदोलनकांची धरपकड

Photo : @AAPMumbai

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबै बँकेत घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे. आता दरेकरांविरोधात आम आदमी पार्टी देखील आक्रमक झाली आहे.


मुंबै बँकेत दरेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीने दरेकरांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. प्रवीण दरेकरांचा जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही अशी भुमिका आपच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी प्रवीण दरेकर चोर है…गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है…च्या जोरदार घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या. त्यावेळी पोलिसांकडून आंदोलनकांची धरपकड करण्यात आली.या सर्व आरोपांवर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी दरेकरांनी हे आरोप फेटाळून लागवले आहेत. तसेच ते म्हणाले, बँकेचा नफा पंधरा कोटी असताना दोन हजार कोटींचा घोटाळा होणे शक्य नाही, त्यामुळे मी आपचे शिंदे आणि काँग्रेसचे भाई जगताप, आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अब्रू नुकसानचीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे.


दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टीने सक्रिय होत असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे.

1 टिप्पणी: