Breaking


आधार नोंदणीत पालघर जिल्हा ठरला सरस !राज्यामध्ये आदर्श निर्माण करण्यास अंगणवाडी सेविका शीतल पाटील यांचा मोठा हात


पालघर : covid-19 च्या महामारी च्या काळात आधार नोंदणीसाठी प्रकल्पात एकच आधार नोंदणी संच उपलब्ध असताना देखील अंगणवाडी सेविका शीतल पाटील यांनी 6500 बालकांची आधार नोंदणी करून राज्यात एक आदर्श निर्माण केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून पालघर जिल्हा परिषदेस महिलादिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात गौरविण्यात आले.


एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे आवाहन, घेतले महत्वपूर्ण निर्णय


उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल या मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढान आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ ,सर्वात जास्त आधार नोंदणी करणाऱ्या गण अंगणवाडी सेविका शीतल पाटील व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास प्रवीण भावसार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्यांना एसएफआय कडून घेराव


आधार कार्ड काढण्याचे फायदे नागरिकांना सांगत त्यांना आधार कार्ड काढण्यासाठी प्रवृत्त केले. आधार कार्ड ची विक्रमी 6500 ची नोंदणी करत पालघर जिल्हा बालकांची आधार नोंदणी करण्यामध्ये राज्यात प्रथम आलेला आहे. अंगणवाडी सेविका शीतल पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळाले असल्याचे सांगितले आहे.शीतल पाटील त्यांच्या या उत्कृष्ट कामाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, तर हे "दोघे" असणार उपमुख्यमंत्री !कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा