Breaking


संतापजनक ! बापानंच केला स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार


पुणे : शिवाजीनगर (Shivaji Nagar) परिसरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये नेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असताना पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे.


हिंजवडीत बापानं स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तर कोथरूडमध्ये आईने मानलेल्या भावाने भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडले आहे. या दोन्ही प्रकरणांमधील आरोपी फरार आहेत. अद्याप पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. 

पुण्यात आठवड्याभरात लैंगिक अत्याचाराच्या 4 घटना घडल्या असून कायदा सुवस्थेचा प्रश्न (law and order) ऐरणीवर आल्या आहे. यामध्ये ओळखीतल्या व्यक्तींकडूनचा होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या ( Physical abuse ) घटनांमध्ये वाढ झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा